Skip to main content
Pradip Madgaonkar | Happy Birthday Kimi Katkar | ‘जुम्मा चुम्मा’ गर्ल किमी काटकर, मनोरंजन विश्वात आल्यावर बदलले नाव!
तुम्ही 90च्या दशकातील चित्रपट पाहत असाल, तर कदाचित तुम्ही 'जुम्मा-चुम्मा दे दे' हे गाणे नक्कीच पहिले असेल. या गाण्यावर अमिताभ बच्चन आणि किमी काटकरचा (Kimi Katkar) डान्सही तुम्हाला आठवत असेल.11 डिसेंबर 1965 रोजी जन्मलेली किमी आज 57 वर्षांच्या झाल्या आहेत.किमी काटकर यांनी सहाय्यक अभिनेत्री म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. किमी यांनी जेव्हा फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले तेव्हा त्या केवळ 20 वर्षांच्या होत्या. त्यांच्या अभिनयाची सुरुवात ‘पत्थर दिल’ या चित्रपटातून झाली होती, ज्यामध्ये त्या सहाय्यक अभिनेत्री होत्या. त्याच वर्षी किमीला ‘Adventures of Tarzan’ हा चित्रपट मिळाला.
Comments
Post a Comment